
Sudhir Mungantiwar | ‘अजित पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या…’, सुधीर मुनगंटीवार यांचा खळबळजनक आरोप
गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) गंभीर आरोप केले आहेत. राज्यात भ्रष्टाचार (Corruption) बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. यावर भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी पलटवार केला आहे. अजित पवारांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या (Alcohol Bottles) मंत्रालयात सापडल्या असल्याचा गंभीर आरोप सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. ते गोंदियात बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात कितीदा बसायचे त्याची श्वेतपत्रिका काढून लोकांना वाटाव्या, त्यांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्या. हजारो दारुच्या बाटल्या मंत्रालयात सापडणं हे मंत्रालयाचे काम आहे का? असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) गंभीर आरोप केले. आत्ताचे मंत्री हे मंत्रालयात बसत नसून फिरत असतात, या अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
आत्ताच्या सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरले आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सत्तेत आम्ही होतो पण सत्तेचा माज आम्ही केला नाही. आत्ताचे मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं कामं करुन देण्यासाठी मार्केटमध्ये फिरत आहेत, असा गंभीर आरोप (Allegation) अजित पवारांनी केला.
अजित पवार पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा माज चढला आहे.
केवळ ठराविक आमदारांना सांभाळायचं चालले आहे. निधी देताना मुद्दाम आडकाठी आणली जाते.
सरकारचे मंत्री कोणाला विचारत नाहीत. मंत्रिमंडळात बसत नाहीत. काही जणांकडून घाणेरडे शब्द वापरले जातात.
हे सर्व पाहून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Late Yashwantrao Chavan) साहेबांच्या डोळ्यात पाणी येत असेल असेही अजित पवार म्हणाले.
Web Title :- Sudhir Mungantiwar | sudhir mungantiwar made serious allegations against ajit pawar and mahavikas aghadi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update