शिवसेनेचे आमदार फुटतील का ?, सुधीर मुनगंटीवार म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसून शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा करत आहेत. शिवसेना भाजपवर दबाव टाकून सत्तेत जास्तीतजास्त वाटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्याचबरोबर शिवसेना देखील मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झाली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला मिळण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यानंतर आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या आमदार फुटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, हे शक्य होणार नसून शिवसेनेच्या आमदारांना कुणीही फोडत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे आमदार फुटणे कठीण असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. सर्व आमदार हे सन्माननीय असल्याने अशी फोडाफोडी होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर सत्ता नसताना शिवसेना आणि भाजपचे आमदार फुटले नाहीत तर आता सत्ता समोर असताना ते कसे काय फुटतील असे देखील त्यांनी म्हटले. त्याचबरोबर शिवसेनेशीच युती करावी, दुसरा पर्याय पाहू नये असे आम्हाला केंद्रातून आदेश आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर आमदार फोडाफोडीचा आरोप केला होता. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडण्याची कुणाची हिंमत नाही असेदेखील म्हटले होते. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

You might also like