Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘…तर तुम्हीही आमच्या कानात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक (Maharashtra Vidhansabha Speaker Election) आणि अभिनंदन प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार खोचक टिका केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माझ्या कानात जरी सांगितले असते की, आता अडीच वर्ष झाली आहेत, मला मुख्यमंत्री व्हायचंय, तर मी उद्धवजींना सांगितले असते, असे अजितदादा म्हणाले. यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही आपल्या भाषणात अजित पवारांना टोला लगावला.

 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या कानात सांगितले नाही, ती त्यांची चूक होती. पण तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री बनावे, असे कधी वाटले तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा. जयंत पाटलांच्या कानात कधीच सांगू नका, तिथे सांगाल तर धोका आहे. इच्छा होईल तेव्हा फक्त कानात सांगा.

आज विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.
यात त्यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांना सुद्धा सोडले नाही, त्यांनाही शाब्दिक चिमटे घेतले. यानंतर मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री, बंडखोर आमदार, भाजपाचे जुने नेते आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये यापूर्वी गेलेल्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या.

अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि मी अनेक वर्षे एकत्र काम करत आहोत.
त्यांनी माझ्या कानात जरी सांगितले असते की अडीच वर्ष झालीत, आता मला मुख्यमंत्री बनायचे आहे.
तर मी नक्कीच उद्धव ठाकरेंशी बोललो असतो.

 

आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. यानंतर पवार विधानभवनात उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरेंकडे पहात म्हणाले,
काय आदित्य तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता ना? यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | BJP leader sudhir mungantiwar criticize ajit pawar during on cm post eknath shinde devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar On Girish Mahajan | ‘देवेंद्र फडणवीस CM न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही फेट्याने डोळे पुसत आहेत’ – अजित पवार

 

Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन… अजितदादांच्या भाषणाची जोरदार चर्चा

 

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात पुणे शहर आणि जिल्ह्याला किती मंत्रीपदे?