Sudhir Mungantiwar | वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना धमकी देणारा आहे तरी कोण?

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेसेज (Threatening Whatsapp Message to Milind Narvekar) केला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नार्वेकरांना धमकी देणाऱ्याचं चरित्र मलाही जाणून घ्यायचं आहे. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हा कोण आहे बाबा ? असा सवाल भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. सुधीर मुगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे वर्ध्यात पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, गुडांची एवढी हिंम्मत की ते वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना व्हॉट्सअ‍ॅप करत आहेत.  त्यामुळे वाटत की, कायदा व सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाही. नार्वेकर यांना धमकी देणं हे तर मला आश्चर्य वाटतं. नार्वेकरांना धमकी देणाऱ्याचं चरित्र मलाही जाणून घ्यायचंय. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हो कोण आहे बाब ? असं मुनगंटीवार म्हणाले.

तसेच राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आवाज काढून बदली करण्यास सांगितलं, याचा अर्थ काय ?  असं सांगणाऱ्याला बेड्या ठोकल्या पाहिजेत. कोणाचा ओरिजनल आवाज असला तरी बदली करायची नाही. असा जीआर सरकारने काढला पाहिजे. नार्वेकर स्वत:ला वाघ म्हणतात, त्यांना धमकी दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा असे ही मुनगंटीवार म्हणाले.

याशिवाय संजय राठोड (sanjay rathod) यांच्या विरोधात तक्रार खरी खोटी आहे याची चौकशी व्हावी,
वेगाने चौकशी व्हावी. काय खरं काय खोटं ते पुढं आलं पाहिजे.
काय खरं काय खोटं याबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे. लोकांच्या मनात शंका ठेऊ नका.
एसआयटी चौकशी होईल याबाबत पूर्वीच मत व्यक्त करणे योग्य नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Web Title :-  Sudhir Mungantiwar | who is threatening shiv sena leader milind narvekar question by sudhir mungantiwar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IT Refund | प्राप्तीकर विभागाने 9 ऑगस्टपर्यंत करदात्यांना पाठवले 47318 कोटी रुपये

Delivery Scam on WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झालंय डिलिव्हरी ‘स्कॅम’, एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट; जाणून घ्या

Pune Police | सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर