तर…डान्सबार बंदी साठी अध्यादेश काढणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- डान्सबार परवान्यासाठी राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. दरम्यान गरज पडल्यास डान्सबार बंदी साठी अध्यादेश काढू, मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू. असे राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली असून. राज्य सरकारने यासंदर्भात अनेक अटी लावल्या असून, डान्सबारसंदर्भात राज्य सरकारच्या कठोर अटी सुप्रीम कोर्टाने शिथील केल्या आहेत. यामुळे मुंबई आणि राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत डान्सबार सुरु ठेवण्याची अट सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. डान्सबार मालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या डान्सबार संदर्भातील निर्णयानंतर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, डान्सबारच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार असून त्यासाठी विधी व न्याय विभागाची मदत घेऊ.आम्ही विधिमंडळात डान्सबार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतली आहे. गरज पडल्यास डान्सबार बंदी साठी अध्यादेश काढू, मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू,असेही ते यावेळी म्हंटले.