कोरड्या खोकल्यानं हैराण आहात ? करा ‘हे’ 6 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकांना कोरड्या खोकल्याच्या त्रासाची समस्या उद्भवते. कोरड्या खोकल्यात कफ होत नाही. याचं कारण, थंडी, धूम्रापान, फुप्फुसाचे आजार, कॅन्सर किंवा अस्थमा असू शकतो. जर तुम्हाला सामान्य खोकला असेल तर तो घरगुती उपाय करूनही बरा होऊ शकतो. आज आपण असेच काही सोप घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) अनंतमूळच्या पानांचे पाणी – अनंतमूळ ही अशी एक औषधी वनस्पती आहे जी सर्वत्र आढळते. याची 4-5 पान घेऊन ती चांगली उकळून घ्या. आता हे पाणी उकळून गाळून घेतल्यानंतर त्याचं सेवन करा. हे पाणी पिल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी उलटी होते. याच्या मदतीनं घसा आणि पोटात असणारे विषारी घटक, पित्त आणि कफ असेल तर तोही बाहेर पडतो. असं लागोपाठ 2 दिवस केलं तर यामुळं खोकला बरा होतो. याचं सेवन करताना हे ही लक्षात असू द्या की, दिवसातून एकदाच याचं सेवन करायचं आहे. जर याचं सेवन तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा केलं आणि वारंवार उलट्या केल्या तर तुमचं शरीर कमजोर होतं.

2) आलं आणि मध – कोरड्या खोकल्यासाठी घरात सहज उपलब्ध होणारं आलं आणि मध हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला आल्याचा रस काढायचा आहे. यात मध टाकायचा आहे. यानंतर हे मिश्रण दिवसातून 2-3 वेळा चाटायचं आहे. यानं घशाला आराम मिळतो आणि तुमचा खोकलाही जातो. या मिश्रणात जर थोडी काळी मिरी घातली तर यानं लवकर फायदा मिळतो.

3) हळदीचं दूध आणि खारीक – हळदीच्या दुधाचाही खोकल्यासाठी खूप फायदा होतो. हळदीत अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. यामुळं संसर्गापासून बचाव होतो. यासाठी तुम्ही रोज रात्री झोपताना हळदीचं दूध पिऊ शकता. यामुळं कोरड्या खोकल्याची समस्याही दूर होते. जर या हळदीच्या दुधात 4-5 खारका घातल्या तर यामुळं लवकर फायदा मिळतो.

4) लसूण – लसूण तसा तर उष्ण आहे. परंतु यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात. लसणाच्या काही पाकळ्या तुपात तळून घ्या. त्या गरम असतानाच पाकळ्यांचं सेवन करावं. यामुळं गळ्याला थोडा शेकही मिळतो आणि आराम देखील. कोरडा खोकला असेल तर लसूण यासाठी रामबाण औषध मानलं जातं.

5) काळी मिरी, जायफळीची पूड आणि मध- हे सर्व पदार्थ एकत्र करून जर याचं सेवन केलं तर यामुळं लवकर फायदा मिळतो. दिवसातून 3-4 वेळा याचं सेवन करावं. हे घेतल्यानंतर यावर गरम पाणी प्यावं.

6) गरम पाणी आणि मीठ – गरम पाण्यात मीठ घालून जर गुळण्या केल्या तर यानंही कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. घसा दुखत असेल तर यानं फरक पडतो. दिवसातून 2-4 वेळा या पाण्यानं गुळण्या कराव्यात. लवकरच आराम मिळेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.