Sugar Content In Sugarcane Juice | गोड ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते?; जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sugar Content In Sugarcane Juice | उन्हाळा म्हटलं की गरमी तर होणारच. उन्हाळ्यामध्ये अधिक कडाक्याचे उन असल्याने त्याच्या झळाही अधिकच लागत असतात. यामुळे माणसाला सावली, गारव्याची खूप आवश्यकता असते. उन्हाळ्यात थकवा अधिक लागल्याने तोंडालाही सोकट पडली असते. त्यामुळे अनेकजणांचा थंड पेयजल कडे अधिक कल असतो. मात्र थंड आणि गोड ऊसाचा रसही (Sugarcane Juice) पित असतात. मात्र अनेकांच्या मनात शंका असते की उसाच्या रसात साखर असते त्यामुळे रक्तातील साखर वाढणार तर नाही ना? त्यामुळे ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर (Sugar Content In Sugarcane Juice) असते? याबाबत जाणून घ्या.

 

ऊसाच्या रसामध्ये कोणते उपयुक्त घटक असतात (What Are The Useful Ingredients In Sugarcane Juice) ?
240 मिली. उसाच्या रसामध्ये 250 कॅलरी असतात. ज्यात 30 ग्रॅम नॅचरल शुगर असते. ऊसाच्या रसात कोलेस्ट्रॉल, फायबर, त्याचबरोबर प्रोटीन याची मात्रा शून्य असते. मात्र यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसंच लोहं यांचा समावेशही असतो. (Sugar Content In Sugarcane Juice)

ऊसाच्या रसामध्ये प्रत्येक ग्लासात 13 ग्रॅम आहारातील फायबर असते, जे फायबरच्या दैनंदिन मूल्याच्या 52 टक्के असते. बहुतेक अमेरिकन लोक दररोज केवळ 10 ते 15 ग्रॅम फायबर खातात, तर शिफारशीनुसार, दररोजचे सेवन 20 ते 35 ग्रॅम इतके असते. असं युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरचं (University Of Maryland Medical Center) म्हणणं आहे.

 

त्याचबरोबर ऊसाच्या रसामध्ये फॅट (Fat) नसते, मात्र, त्यामध्ये 30 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. ऊसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते, कारण त्यातील फायबर काढून टाकलं जाते. दरम्यान, तुम्ही दररोज 6 ते 9 चमचे साखरेचे सेवन मर्यादित करा कारण अधिक साखरेचे सेवन लठ्ठपणा (Obesity) आणि वजन वाढण्याची शक्यता वाढवते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर ऊसाच्या रसाचे सेवन करावे का? यासाठी डॉक्टरांचा देखील सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Advt.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Sugar Content In Sugarcane Juice | how much sugar include in sugarcane juice know about this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fruit For Cholesterol Patients | उन्हाळ्यातील ‘ही’ 5 फळे ज्यांच्याद्वारे बिघडलेल्या कोलेस्ट्रॉलवर मिळवू शकता नियंत्रण, जाणून घ्या आणखी फायदे

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा