×
Homeआरोग्यSugar Control Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावे डाळिंबाचे सेवन,...

Sugar Control Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावे डाळिंबाचे सेवन, जाणून घ्या फायदे आणि करावा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sugar Control Diet | लाल रंगाचे डाळिंब (Pomegranate ) केवळ सुंदरच दिसत नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध, डाळिंबामध्ये फायबर, जीवनसत्त्व K, C आणि B, आयर्न, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा -6 फॅटी अ‍ॅसिड आणि इतर अनेक पोषक असतात जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. डाळिंब खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. डाळिंबात अँटी-हेलिकोबॅक्टर पायलोरी प्रभाव असतो जो पोटाशी संबंधित आजार कमी करण्यासाठी प्रभावी आहे. (Sugar Control Diet)

 

डाळिंबाचे सेवन साखरेच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मानी समृद्ध, डाळिंबात ग्रीन टी आणि रेड वाईनपेक्षा जवळजवळ तिप्पट अँटीऑक्सिडेंट असतात, जे मधुमेहामुळे होणार्‍या नुकसानाशी लढण्यास मदत करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डाळिंबाच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असलेल्या इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात. (Sugar Control Diet)

 

डाळिंबात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही कमी असते, कारण कार्बोहायड्रेट्सचे चयापचय लवकर होते, ज्यामुळे ब्लड शुगर वाढते. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाचा अंदाजे ग्लायसेमिक लोड (GL) 18 आहे. हे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल (Blood Sugar Level Control) करण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे.

 

मधुमेह हा खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होणारा आजार असून, आहारावर नियंत्रण ठेवल्यास हा आजार बर्‍याच अंशी आटोक्यात ठेवता येतो. मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर डाळिंबाचे सेवन करावे.

 

डाळिंब इम्युनिटी मजबूत करते तसेच विषाणूजन्य संसर्गावरही उपचार करते. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

शुगरच्या रुग्णांसाठी डाळिंबाचे फायदे :
अँटी-इमफ्लेमेटरी गुणधर्म असलेले अँटिऑक्सिडंट असतात, जे हाय ब्लड शुगरची लक्षणे जसे की थकवा, स्नायू दुखणे कमी करतात.

या फळामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड आहे ज्यामुळे हाय ब्लड शुगर रुग्णांना मदत होते.

डाळिंब शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास देखील मदत करते.

या फळामध्ये असलेले फिनोलिक संयुग वजन कमी करण्यास आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.

 

शुगरच्या रुग्णांनी कसे करावे डाळिंबाचे सेवन :

हाय ब्लड शुगर असलेले रुग्ण थेट फळ म्हणून डाळिंब खाऊ शकतात. पण जर तुम्ही डाळिंब खाण्यासाठी काही नवीन मार्ग शोधत असाल तर तुम्ही या दोन प्रकारे डाळिंब खाऊ शकता.

 

1. सलाड (Salad) :
सलाड किंवा फ्रूट सलाडमध्ये डाळिंब वापरू शकता. डाळिंबाचे दाणे काढून सलाडमध्ये टाकल्यास डाळिंबाची चव वाढते.

 

2. स्मूदी :
आवडता सुकामेवा, बिया, डाळिंबाचे दाणे आणि इतर फळांसह स्वादिष्ट स्मूदीच्या स्वरूपात डाळिंबाचे सेवन करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sugar Control Diet | amazing health and nutrition benefits of pomegranate for sugar patients know how to use it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, जाणून घ्या आरोग्यासाठी कशाप्रकारे लाभदायक

Weight Loss Drink | वजन कंट्रोल करते नारळ पाणी, जाणून घ्या आरोग्याला कसा होता फायदा

Problem Of White Discharge | व्हाईट डिस्चार्जने त्रस्त असाल तर ‘या’ 5 आयुर्वेदिक उपायांनी करा उपचार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News