Sugar Level Control Tips | मधुमेहाच्या समस्येमध्ये ‘या’ आहेत फायदेशीर वनस्पती; वाढलेली शुगर झटपट कमी करतील, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sugar Level Control Tips | अनेक लोकांना वेगवेगळे आजार असतात. दरम्यान अनेक माणसांमध्ये साखरेचं प्रमाण देखील वाढलेलं दिसून येते. रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level Control Tips) आटोक्यात राहण्यासाठी मधुमेहाच्या (Diabetes Control) रूग्णांनी आपली जीवनशैली त्याचबरोबर खाण्याच्या विविध सवयींची काळजी घेणे आवश्यक आहे. साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी काही नैसर्गिक उपाय देखील समोर आहेत.

 

दरम्यान, तुळशी (Tulsi), ऑलिव्ह (Olive), गुडमार (Gurmar) आणि टर्निप (Turnip) यांसारख्या वनस्पतींची हिरवी पाने तुम्हाला मधुमेहाच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरतील. असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. त्यामुळे संबंधित वनस्पती बाबत सविस्तर जाणून घ्या. (Sugar Level Control Tips)

 

1. ऑलिव्ह (Olive) –
ऑलिव्हची (Olive) पाने चघळल्यानेही फायदा होईल. जर टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांनी ऑलिव्हच्या पानांचे सेवन केले तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. वर्ष 2013 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले की ऑलिव्हच्या पानांच्या सेवनाने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. या अभ्यासात 46 लोकांना ऑलिव्हची पाने खायला दिली गेली आणि 12 आठवड्यांनंतर असे दिसून आले की त्याचा मधुमेहाच्या रुग्णांना फायदा झाला.

 

2. गोड तुळस (Sweet basil) –
स्टीव्हिया म्हणजे गोड तुळस (Sweet basil) मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. 2018 च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की ज्या रुग्णांनी गोड तुळस खाल्ली त्यांना रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत झाली. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) नुसार गोड तुळशीच्या पानांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

3. गुड़मार (Gurmar) –
औषधी गुणधर्मांनी समृद्ध, गुडमार (Gurmar) रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखले जाते. 2013 च्या अभ्यासानुसार, जेव्हा टाइप 1 आणि टाइप 2 च्या रूग्णांना 18 महिने जास्वंदाची पाने दिली गेली तेव्हा त्यांच्यामध्ये इन्सुलिन घेतलेल्या लोकांपेक्षा जास्त फरक होता. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.

 

4. टर्निप (Turnip) –
टर्निपमध्ये (Turnip) म्हणजेच पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
अभ्यासानुसार, टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांनी फायबरचे सेवन केल्यास ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
टर्निपची पाने चघळल्याने टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sugar Level Control Tips | sugar level control tips type 2 diabetes patient should chew these 4 leaves olive stevia turnip gudmar blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Workers Strike | राज्य सरकारचा मोठा निर्णय ! एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण अशक्य

 

Pune Crime | सराईत गुन्हेगार जाहेद गणी शेख उर्फ लंगडा टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

 

Ayurveda For Good Sleep | रात्री झोप पूर्ण होत नाही का? मग ‘या’ 6 आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत