ऊस उत्पादकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारनं साखर कारखान्यांना दिलं मोठ गिफ्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साखर कारखान्यांना साखर विकास निधीतून (Sugar Development Fund) सॉफ्ट लोन (Soft Loan) घेण्यासाठी यापुढे मंत्रालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण सरकारने कर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे. साखर कारखान्यांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शुगर डेवलपमेंट फंडचे नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. याद्वारे साखर कारखानदार आता घरी बसून कर्जासाठी अर्ज करु शकतील.

साखर विकास निधी मध्ये १५,००० कोटी रुपये इतकी रक्कम ठेवली गेली आहे. या निधीतून कारखान्यांना उसाच्या देयकासाठी निधी मिळतो. निधीमधून इथेनॉल तयार करण्यासाठीही कर्ज मिळते.

मार्चमध्ये सरकारने या निधीत ११,००० कोटी रुपये जोडले. आतापर्यंत ११,००० कोटी रुपयांचे वाटप झाले नाही. सरकारकडे कर्जासाठी एकूण ४१८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या निधीतून सरकार साखर कारखान्यांना ५% दराने कर्ज देते तसेच सरकार व्याजावर सूट याच निधीतून देते.

शेतकर्‍यांच्या बाजूने मोठा निर्णय
साखर कारखान्यांची रोख स्थिती सुधारण्यासाठी, साखर साठा कमी करण्यासाठी आणि उसाची थकबाकी वेळेवर परतफेड करण्यासाठी सुलभ व्याजदराच्या कर्जाची घोषणा करण्यात आली होती.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केंद्र व राज्ये यांनी निश्चित केलेल्या उसाच्या किंमतीवर आधारित यंदा उसाचे थकीत उत्पन्न ९,००० कोटींपेक्षा जास्त आहे.

ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात भारताने अनुक्रमे ३.२५ कोटी टन आणि ३.३१ कोटी टन साखर उत्पादन केले होते, ज्यात साखरेचा घरगुती खप २.५ कोटी टनांपेक्षा जास्त झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/