हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरीर निरोगी राखण्यात साखर आणि मीठ या दोन्ही वस्तूंची भूमिका महत्वाची ठरते. दोन्हीची गरजेपेक्षा जास्त आणि कमी मात्रा शरीरासाठी हानिकारक असते. मीठ आणि साखरेच्या असंतुलनामुळे शरीराचे कोणते नुकसान होते आणि दोन्ही पैकी कशाचा जास्त परिणाम हृदयावर होतो ते जाणून घेवूयात…

मीठाचा हृदयावर परिणाम
ब्लड प्रेशर किंवा हृदयाची समस्या असणारे मीठ कमी खातात. मात्र, हा विचार करणे सुद्धा चुकीचे आहे की सोडियम कमी केल्याने हृदयाला काही धोका नाही.

सोडियमचे सेवन कमी केल्याने काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर कमी होऊ शकते. परंतु काही लोकांमध्ये सोडियमची कमी मात्रा ब्लड प्रेशर वाढवते. कमी सोडियममुळे हार्टरेट आणि हृदयावर सुद्धा दाब वाढतो.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, दिवसात 1.5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करू नये. अन्यथा हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तर, 50 पेक्षा जास्त वय आणि डायबिटीजच्या रूग्णांनी रोज 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठाचे सेवन करू नये.

सोडियम एक आवश्यक पोषकतत्व आहे आणि अनेक स्टडीजमधून समजले आहे की, हृदयाला आणि शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी बहुतांश लोकांनी प्रतिदिन 3-6 ग्रॅमच्या दरम्यान याचे सेवन केले पाहिजे. बहुतांश लोक याच मर्यादेत सोडियम घेतात.

साखरेचा हृदयावर परिणाम
पॅक्ड फूड्समध्ये 75 टक्के आर्टिफिशियल शुगर असते. शुगरची जास्त मात्रा हार्मोन्स बिघडवते. ज्यामुळे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.

साखरेमुळे हार्टअटॅकचा धोका वाढतो. साखरेच्या जास्त सेवनाने लठ्ठपणा, दाताच्या समस्या, हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर आणि हार्टच्या समस्या होतात. अमेरिकन गाइडलाइन कमेटीने साखरेच्या तुलनेत मीठ जास्त नुकसानकारक असल्याचे म्हटले आहे. फुड इंडस्ट्रीला सोडियमचा स्तर कमी करण्यास सांगितले आहे.