Sugarcane Juice Benefits | चवीला उत्कृष्ट असण्यासह आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो उसाचा रस, जाणून घ्या असंख्य फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फळांचा ज्यूस (Fruit Juice) केव्हाही प्यायल्यास झटपट ताजेतवाने करतो. विशेषतः थंड ज्यूस उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो. मात्र, थंडीतही ज्यूस प्यायल्यास ताजेतवाने वाटते. मोसंबी, संत्री आणि अनेक फळांच्या रसाप्रमाणे तुम्ही उसाचा रसही (Sugarcane Juice Benefits) पिऊ शकता. हा रस तुम्हाला केवळ ताजेतवाने करत नाही तर शरीराला ऊर्जा देतो आणि हे एक हेल्दी ड्रिंक (Sugarcane Juice Benefits) आहे.

 

यामध्ये आयर्न (Iron), मॅग्नेशियम (Magnesium), कॅल्शियम (Calcium), पोटॅशियम (Potassium) आणि फॉस्फरस (Phosphorus) सारखे गुणधर्म असतात. हे सर्व घटक शरीराला आवश्यक असतात. हे उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित करतात, हाडे मजबूत करतात, कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी नियंत्रित करतात, वजन कमी करण्यास मदत करतात. यासोबतच कावीळ आणि वायरल तापातही हे फायदेशीर आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट (Body Hydrate) ठेवण्यासाठी उसाचा रस (Sugarcane Juice Benefits) खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया उसाचा रस पिण्याचे फायदे.

 

कावीळमध्ये फायदेशीर (Beneficial In Jaundice)
कावीळ (Jaundice) झाल्यास उसाचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच रुग्णाला देतात. कारण याच्या सेवनाने इम्युनिटी (Immunity) वाढते. त्याचबरोबर मधुमेहाचा त्रास असलेले लोकही उसाच्या रसाचे सेवन करू शकतात. यात खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetes Patients) फायदेशीर आहे.

 

पचनक्रिया (Digestion) मजबूत करतो
उसाच्या रसात पोटॅशियमचे (Potassium) प्रमाण चांगले असते, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते.
यासोबतच उसाचा रस पोटातील संसर्ग दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. बद्धकोष्ठतेच्या (Constipation) समस्येत उसाचा रस प्या.
यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.

कर्करोगात प्रभावी (Effective in Cancer)
यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम आढळते, जे कर्करोगाशी (Cancer) लढण्याची क्षमता देते.
या घटकांमुळे उसाच्या रसाची चव किंचित खारट असते.

 

त्वचेसाठी लाभदायक (Beneficial For Skin)
उसाच्या रसामध्ये अल्फा हायड्रॉक्सी अ‍ॅसिड (Alpha Hydroxy Acid) आणि ग्लायकोलिक अ‍ॅसिड (Glycolic Acid) असते,
ज्यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. यासोबतच त्वचेला अतिरिक्त ग्लो येतो. यासाठी दररोज उसाचा रस (Sugarcane Juice) पिऊ शकता.

 

Web Title :- Sugarcane Juice Benefits | know amazing health benefits of drinking sugarcane juice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Brain Dead | विवाहाच्या आदल्या दिवशी मुलीचा मेंदूविकाराने मृत्यु; दु:खात असलेल्या कुटूंबीयांनी घेतला धाडसी निर्णय

 

Almonds Side Effects | आरोग्यासाठी लाभदायक आहेत बदाम, परंतु ‘या’ 5 लोकांसाठी ठरू शकतात नुकसानकारक

 

Sambhaji Raje | खासदार संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार’

 

# हेल्थ टिप्स # हेल्दी लाइफस्टाइल # ऊसाचा रस # ऊसाच्या रसाचे फायदे # Lifestyle and Relationship # Health and Medicine # lifestyle # health # health tips # healthy lifestyle # Sugarcane Juice # Sugarcane Juice Benefits # Healthu diet Tips # Sugarcane Juice For Health