‘या’ टीव्ही अभिनेत्रीला ‘रातोरात’ काढलं होतं ‘शो’च्या बाहेर, पुढं झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही शोमध्ये एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराने रिप्लेस करणे ही कॉमन गोष्ट आहे. अनेक असे सेलिब्रिटी आहेत ज्यांना एका रात्रीत शोमधून बाहेर काढण्यात आले होते. असेच काही प्रसिद्ध गायक आणि कॉमेडियन सुंगधा मिश्रा हीच्यासोबत घडले. एका मुलाखतीमध्ये सुगंधाने सांगितले की, ‘२००८ मध्ये किड्स रियालिटी शो ‘छोटे मियां’ साईन केले होते. माझी होस्टिंग करण्याचा पहिला अनुभव होता. त्याआधी मी फक्त कॉमेडी आणि अ‍ॅक्टिंग केली होती. यामुळे माझ्या आवाजातील थ्रो स्ट्रॉंग नव्हते. माझ्या आवाजाच्या आधारावर शो मेकर्सने सांगितले की, मी होस्टिंग करण्यासाठी सक्षम नाही.’

View this post on Instagram

😇

A post shared by Sugandha Mishra (@sugandhamishra23) on

सुगंधाने सांगितले की, ‘शो च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये माझ्या जागी एक चाइल्ड आर्टिस्टला ठेवले होते. मेकर्सने मला सांगितले की, हा लहान मुलांचा शो आहे याला लहान मुलेच होस्ट करणार. यावर मी त्यांना प्रश्न विचारला की, मला साइन करण्याआधी पहिले या गोष्टीचा का विचार केला नाही ? या शोचा हिस्सा बनण्यासाठी मी अनेक प्रोजक्ट नाकारले आहे. यामुळे माझे खूप नुकसान झाले आहे’

सुगंधा पुढे म्हणाली की, ‘यानंतर मी माझ्या आईला बोलावले आणि खूप रडले. मी या शोसाठी एक रेंटवर अपार्टमेंट घेतले होते कारण मला वाटले होते की, शो ३ महिन्यापर्यंत चालेल आणि मी रेंटचे पैसे देऊ शकेल पण मला शोमधून बाहेर काढले गेले त्यामुळे मी खूप नाराज झाले आहे.’

ती पुढे म्हणाली की, ‘त्यावेळी मी इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे मला याची जास्त माहिती नव्हती. त्यामुळे मला हे कशाप्रकारे हॅंडल करायचे हे कळत नव्हते. मी कॉन्ट्रॅक साइन केला होता पण तरीही मला स्वतःला हेल्पलेस वाटायला लागले कारण मला याप्रकारची माहिती नव्हती. मला माहित नव्हते की, कोणती वस्तू कसे काम करते. ‘

सध्या सुगंधा कॉमेडी शोमध्ये आपली शानदार कॉमेडी करुन सगळ्यांना इंप्रेस करत आहे. यामध्ये कॉमेडी नाइट्स विद कपिल, कपिल शर्मा शो, कॉमेडी सर्कस के टशनसारखे शो सामिल आहे.

View this post on Instagram

Stay Happy Stay Blessed 😉

A post shared by Sugandha Mishra (@sugandhamishra23) on