सुहाना खानच्या नव्या लुकची सोशलवर ‘चर्चा’ ! कातिल लुक पाहून चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) ची लाडकी सुहाना खान (Suhana Khan) हिनं काही दिवसांपूर्वीच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते, ज्यात ती चक्क रडताना दिसत होती. या फोटोंची खूप चर्चा झाली होती. सुहाना आपल्या फोटोंमुळं आणि व्हिडिओंमुळं नेहमीच चर्चेत येत असते. नुकताच तिचा एक फोटो समोर आला आहे, जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या लुकनं तिनं पुन्हा एकदा साऱ्याचं लक्ष वेधलं आहे.

सुहानानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर स्कर्ट घातलेली सुहाना खूपच कातिल अंदाजात दिसत आहे. सुहाना खूपच सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे.

सुहानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा (लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue) काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो (Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

You might also like