अनन्या पांडेच्या बॉलिवूड डेब्यूवर सुहाना खान म्हणते…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान व चंकी पांडे ची मुलगी अनन्या पांडे या दोघींच्या मैत्रीची चर्चा खुप वाढत आहे. त्या दोघींचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. या फोटोवरुन त्या दोघींमध्ये घट्ट मैत्री असल्याचे दिसून येत आहे. अनेक पार्टी व डिनर ला जाताना त्या दोघी एकत्र दिसतात.

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही तिच्या आगामी चित्रपटात प्रमोशनसाठी व्यस्त आहे. तिचा आगामी चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ प्रमोशनच्या वेळी अनन्याला चित्रपटातील भूमिकेबद्दल सुहानाला काय वाटते असे विचारण्यात आले तेव्हा अनन्या म्हणाली की, सुहाना जेव्हा ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चा ट्रेलर पाहिल त्यामधील माझी भूमिका तिला नक्कीच आवडेल व ती खुप आनंदी होईल.

यानंतर सुहानाच्या अभिनयाच्या दुनियेतील पदार्पणाबद्दल काही प्रश्न अनन्याला विचारण्यात आले तेव्हा अनन्याने सांगितले की , आम्ही दोघी सामान्य बहिणी आहोत. आमच्यामध्ये कामाविषयी अशी कोणतीच चर्चा होत नाही. पण सुहाना लवकरच अभिनयाचे धडे घेण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार आहे. आणि मला विश्वास आहे की ती तिचे शिक्षण मन लावून पुर्ण करेल. त्याचबरोबर तिला या शिक्षणाचा बॉलिवूडमध्ये देखील उपयोग नक्कीच होईल.

अनन्याचा आगामी चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ प्रदर्शित होण्याअगोदर तिने ‘पती पत्नी और वो’ हा दुसरा चित्रपट साईन केला आहे. दुसऱ्या चित्रपटात तीच्या सह कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

You might also like