‘किंग’ खानची लाडकी सुहानाचं Instagram अकाऊंट ब्लू टिक Verified, पप्पासोबत नाही एकही फोटो
पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुपरस्टार शाहरुख खानची तीनही मुलं इंडस्ट्रीतील पॉप्युलर स्टारकिड आहेत. यापैकी सुहाना खान सोशल मीडियावर खूपच फेमस आहे. सोशल मीडियावर तिची भली मोठी फॅन फॉलोविंग आहे. सुहाना आपल्या फोटोंमुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सुहानाचं इंस्टा अकाऊंट आधी प्रायवेट होतं. आता तिचं अकाऊंट पब्लिक झालं आहे. तिच्या इंस्टा अकाऊंला ब्लू टीक मार्कही आलं आहे.
सुहानाच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. बॉलिवड डेब्यू करण्याआधीच सुहानाचे जवळपास 1 लाख 35 हजार फॉलोवर्स झाले आहेत. सुहानानं तिच्या फॅमिलीसोबतही अनके फोटो शेअर केले आहेत. सुहानाचे तिच्या फ्रेंड्ससोबतचे तर अनेक फोटोज व्हायरल झाले आहेत. सुहानाची सर्वात शानदार बाँडिंग कोणासोबत असेल तर ती आहे तिचे पप्पा शाहरुख खानसोबत. परंतु चकित करणारी बाब अशी आहे की, इंस्टावर सुहानाचा शाहरुखसोबत एकही फोटो नाहीये.
11 आठडयांआधीच केली होती लास्ट पोस्ट
सुहानाची इंस्टावरील ही बाबही नोटीस करण्यासारखी आहे की, सुहाना या प्लॅटफॉर्म्सवर जास्त सक्रिय नसते. सुहानानं तिची लास्ट पोस्ट 11 आठवड्यांपूर्वी केली होती. या फोटोत ती आपले दोन्ही भाऊ अबराम आणि आर्यनसोबत दिसली होती.
सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.
https://www.instagram.com/p/Bk2vP_enY0x/
https://www.instagram.com/p/BeI_PjfF6RR/