सुहाना खानचा ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लूम’ सिनेमातील सह कलाकारासोबतचा ‘अनसीन’ फोटो ‘व्हायरल’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान सध्या लॉकडाऊनध्ये आपल्या हॉबिज पूर्ण करताना दिसत आहे. सुहानाचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती मनमोकळेपणानं हसताना दिसत आहे. सध्या फोटोनं सोशलवर अटेंशन घेतलं आहे.

सुहानानं एक शॉर्ट फिल्मनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. द ग्रे पार्ट ऑफ ब्लू असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. यातील एक जुना फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू ही शॉर्ट फिल्म थियोडोर गिमेनो यानं लिहिली होती. गिमेनोनं नुकताच यातील एक फोटो शेअर केला आहे जो शुटींगदरम्यानचा असून बिहाईंड द सीन आहे. इंस्टावरून शेअर करण्यात आलेल्या फोटोत दिसत आहे की, सुहाना किती मनमोकेळेपणाने खुलून हसत आहे.

फोटो पाहूनच लक्षात येत आहे की, सुहानानं आपले सहकलाकार आणि क्रू सोबत किती चांगला टाईम स्पेंड केला आहे. सुहानाचा हा फोटो समोर आल्यानंतर लगेचेच व्हायरल होतान दिसला. सुहाना जरी अद्याप बॉलिवूडमध्ये आली नसली तरी सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग ही एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. अजूनही तिचा हा फोटो सोशलवर चर्चेत आहे आणि चाहत्यांनाही खूप आवडला आहे.