पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Suhana Kundan Cup CA Cricket League | आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित दहाव्या ‘सुहाना कुंदन करंडक’ क्रिकेट लीग २०२३ स्पर्धेत एसीएच स्मॅशर्स संघाने चॅम्प्स् सुपरकिंग्ज् संघाचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (Suhana Kundan Cup CA Cricket League)
शिंदे हायस्कूल मैदान, सहकारनगर येथे झालेल्या स्पर्धेत आकाश भटेवारा याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एसीएच स्मॅशर्स संघाने चॅम्प्स् सुपरकिंग्ज् संघाचा ८ गडी राखून विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना चॅम्प्स् सुपरकिंग्ज् संघाने १० षटकात ५ गडी गमावून ७६ धावा फटकावल्या. अमित बलदोटा (२१ धावा) आणि अमोल कुलकर्णी (२७ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. एसीएच स्मॅशर्स संघाने ८.५ षटकात व २ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली. प्रणव गुप्ता याच्या नाबाद २८ धावा आणि आकाश भटेवारा याच्या नाबाद २६ धावा आणि यश पटेल (१७ धावा) यांच्या खेळीमुळे संघाने विजय साकार केला. (Suhana Kundan Cup CA Cricket League)
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डब्ल्युआयआरसी ऑफ आयसीएआयचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे विभागाचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी सीए योगेश पोद्दार, सीए सचिन पारख, सीए सुमित शहा, सीए अमोल चंगेडिया, सीए अक्षय पुरंदरे, सीए राजेश मेहता, सीए अल्पेश गुजराती, सीए संतोष माने आणि सीए भूषण शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या एसीएच स्मॅशर्स, उपविजेत्या चॅम्प्स् सुपरकिंग्ज् संघ व तृतीय क्रमांकाच्या बिस्मार्ट संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.
सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
चॅम्प्स् सुपरकिंग्ज्ः १० षटकात ५ गडी बाद ७६ धावा (अमित बलदोटा २१, अमोल कुलकर्णी २७, आकाश भटेवारा २-६, प्रणव गुप्ता २-१९) पराभूत वि. एसीएच स्मॅशर्सः ८.५ षटकात २ गडी बाद ७८ धावा (प्रणव गुप्ता नाबाद २८, आकाश भटेवारा नाबाद २६, यश पटेल १७, सुरज मालपानी २-१९); सामनावीरः आकाश भटेवारा;
तिसर्या क्रमांकाचा सामनाः
फिनप्रो ऐसेसः ८ षटकात ६ गडी बाद ७२ धावा (अमोल चंगेडीया २०, अभिषेक खांबेटे १५, ब्रिजभूषण तिवारी १३, अमित खंडेलवाल ३-१९, आयुष तिवारी २-२४) पराभूत वि. बिस्मार्टः ७.२ षटकात ३ गडी बाद ७३ धावा (कृष्णा एस. २९, सम्यक पारेख १४, आयुष तिवारी नाबाद १४, शाल्व करवे २-११); सामनावीरः अमित खंडेलवाल;
उपांत्य फेरीः
चॅम्प्स् सुपरकिंग्जः १० षटकात ३ गडी बाद ११८ धावा (ऋषीकेश कुलवर ७० (३६, १० चौकार, २ षटकार),
नागराज जाधव ३०) वि.वि. बिस्मार्टः १० षटकात ७ गडी बाद ८७ धावा
(आयुष तिवारी ३५, ए. सुब्रमण्यम १६, अमित बलदोटा २-१०); सामनावीरः ऋषीकेश कुलवर;
फिनप्रो ऐसेसः १० षटका ६ गडी बाद ६३ धावा (महेश भायगुडे २९, प्रणव गुप्ता १-११, पार्थवीश शेट्टी २-१३)
पराभूत वि. एसबीएच स्मॅशर्सः ७.३ षटकात ३ गडी बाद ६६ धावा
(प्रणव गुप्ता ३१, आकाश भाटेवारा नाबाद १३); सामनावीरः प्रणव गुप्ता;
Web Title :- Suhana Kundan Cup CA Cricket League | Suhana Kundan Cup CA Cricket League ACH Smashers win the title
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…
Pune Crime News | चोर्या करणार्या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी