‘सुई धागा’ची पहिल्या दिवसाची कमाई माहितीये का ?

मुंबई : वृत्तसंस्था 

मेक इन इंडिया थीमवर आधारित असलेला बहुचर्चित ‘सुई धागा’ सिनेमा धूम धडाक्यात रिलीज झाला. या चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर त्याचं खातं उघडलं. या चित्रपटाने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ८. ५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समजते आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती.

बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार अनुष्का शर्मा, वरुण धवन यांची या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9ddabbf-c3d1-11e8-b95e-e78a4aa0239e’]

भारतामध्ये पहिल्याच दिवशी २ हजार २०० स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट ८ ते ९ कोटी रुपयांची कमाई करु शकतो, असा अंदाज चित्रपट समीक्षक अक्षय राठी यांनी वर्तविला होता. तर रोहित जायसवाल यांनी ७ ते ८.५ कोटी रुपये कमाई होईल असं म्हटलं होतं. त्यानुसार हा चित्रपट यशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट येत्या काही दिवसात आणखी कमाई करेल असं दिसून येत आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये मौजी (वरुण धवन) आणि ममता (अनुष्का शर्मा) यांची कथा रंगविण्यात आली आहे. कपडे विकण्याचा एक लहानसा व्यवसाय ते मेक इंडियाला मिळालेली चालना या चित्रपटामध्ये रंगविण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B079NBHCKM,B01J22KFRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01dfe909-c3d2-11e8-8008-5f956edcd45b’]

सुई धागा नक्की बघा : विराटचा सल्ला

मॅच सुरू असताना विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का शर्मा अनेकदा स्टेडियममध्ये हजेरी लावते. तसंच विराटही अनुष्काचं भरभरुन कौतुक करताना दिसतोय. ‘सुई धागा’ सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग मुंबईमध्ये नुकतंच करण्यात आलं होतं. यावेळी कोहली दाम्पत्य उपस्थित होतं. हा सिनेमा पाहून विराट खूपच भारावला आहे म्हणे. हा सिनेमा मी दोन वेळा पाहिला आहे. तुम्हीही तो नक्की बघा, असं त्यानं आपल्या चाहत्यांना सांगितलंय.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B019FGR5ZC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36a1c50d-c3d2-11e8-823d-7d831572f0e8′]