प्रेमात नापास झालेल्या युवतीचा SSC बोर्डाच्या कार्य़ालयात आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

प्रेम प्रकरणात निराशा आल्याने एका युवतीने नैराश्येतून एसएससी बोर्डाच्या बिल्डींगधील तीसऱ्या मजल्यावरील सार्वजनीक स्वच्छतागृत स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार आज (शुक्रवार) दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडला. या घटनेत ती तरुणी ८० टक्के भाजली असून तिची प्रकृती चितांजनक आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9106d026-b82a-11e8-a6a9-c185a5c952c6′]

पुनम उर्फ गुड्डी बलभीम जाधव (वय-२४ रा. कोंढवा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पुनम जाधव हीने आज दुपारी एसएससी बोर्डाच्या बिल्डींगमधील तीसऱ्या मजल्यावर असलेल्या महिलांच्या स्वच्छतागृत स्वत: ला जाळून घेतले. जखमी अवस्थेत तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापुर्वी तीने लिहीलेली सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीवरुन तिचे एसएससी बोर्डातील एका क्लार्क बरोबर प्रेमप्रकरण असल्याचे समजतेय. त्यामुळे पुनम जाधव हिने प्रेमप्रकरणातूनच आत्महत्येचा प्रयत्न  केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’99aed912-b82a-11e8-9949-e515c2e3db21′]

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसून गंभीर जखमी मुलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.