बंद असलेल्या हॉटेलमध्ये प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न ; प्रेयसीचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बंद असलेल्या हॉटेलमध्ये एका प्रेमियुगलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही धकादायक घटना जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारामध्ये उघडकीस आली आहे. हे प्रेमीयुगल आष्टी तालुक्यातील कडा येथील आहे.

अवंतिका रघुनाथ दळवी (वय-२१ रा. कडा) असे मृत मुलीचे नाव आहे. तर मुकुंद बाळासाहेब भोजने (वय-२५) असे गंभीर असलेल्या मुलाचे नाव आहे.

Mukund Bhojne

मृत अवंतिका दळवी ही पुण्यामध्ये फॅशन डिझायईनचा कोर्स करत असून ती मुळची कडा येथील रहिवासी आहे. तर मुकुंद कडा येथे शिक्षण घेत आहे. या दोघामध्ये प्रेमप्रकरण सुरु होते. मंगळवारी रात्री ते दोघे नगर जामखेड रस्त्यावरील चिंचोडी पाटील शिवारातील एका बंद असलेल्या हॉटेलमध्ये गेले. या ठिकाणी त्या दोघांनी गळफास लावून घेतला. दरम्यान मुकुंदने आपल्या नातेवाईकांना मी चिंचोली पाटील शिवारात असल्याचे सांगितले होते.

नातेवाईकांनी चिंचोली पाटील शिवारात मुकुंदचा शोध घेत होते. त्यावेळी या परिसरात बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अवंतिकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. तर मुलावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
You might also like