धक्कादायक ! महिला पोलीस उपनिरीक्षकाचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला आहे. गंभीर जखमी झालेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पत्रकाराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

मनिषा गिरी असे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

गिरी या उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्या राहात असलेल्या घराच्या चौथ्या मजल्यावरून शुक्रवारी सकाळी खाली पडल्या. त्यानंतर त्यांच्या डोक्याला व शरीरावर जबर मार लागला आहे. तर २ ते ३ फ्रॅक्तर झाले आहेत. त्यामुळे त्या बेशुध्द झाल्या. त्यांना शेजारील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांची प्रकती गंभीर आहे.

वरिष्ठाने लैंगिक छळ केल्याचा आरोप
मनिषा गिरी या दोन महिन्यांपुर्वी आनंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यावेळी तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी २८ मार्च रोजी तशी नोंद स्टेशन डायरीत केला आहे. त्यानंतर पोलीस अधिक्षक आर. राजा यांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमली. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करताच गिरी यांची शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

वरिष्ठ आणि पत्रकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, कुटुंबियांचा आरोप

त्यानंतर गिरी यांनी आता आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.

तर गिरी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला की त्या इमारतीवरून पडल्या. याचा खुलासा त्यांचा जबाब घेतल्यानंतर समोर येईल असे पोलीस अधिक्षक आर. राजा यांनी सांगितले.