बॉलिवूडच्या प्रसिद्ध डान्सरची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : वृत्तसंस्था

तीन महिन्यांपासून पत्नी सोडून गेल्याने नैराश्य आल्याने बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सनर आणि रॅपर अभिजीत शिंदेने राहत्या घऱात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी (दि.२२) सकाळी घडली असून त्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्याने त्याच्या बँकेचे अकाऊंट आपल्या मुलीच्या नावे केलं असल्याचं लिहलं आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31d0b830-a6df-11e8-856f-b366429a2017′]

याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे.

बुधवारी सकाळी घरातल्या सीलिंग पंख्याला लटकून अभिजीने आत्महत्या केली आहे. त्याच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने हा सगळा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. अभिजीतला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a93c240-a6df-11e8-80aa-b9dff4b86ae5′]

प्रसिद्ध डान्सर आणि रॅपर अभिजीत शिंदेची पत्नी त्याला सोडून गेल्या तीन महिन्यापासून माहेरी गेल्यामुळे तो नैराश्यात होता. अभिजीतला 3 महिन्याची मुलगी आहे. मात्र, मुलीला भेटण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला सक्त नकार दिला. त्यामुळे तो खूप नैराश्यात होता. तर दुसरीकडे हाती कोणतंही काम नसल्याने त्याला त्याचीही काळजी वाटत होती. याच सगळ्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.