नैराश्येतून हॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

व्यवसायामध्ये होत असलेल्या नुकसानामुळे नैराश्य आलेल्या हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरामध्ये स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.१९) रात्री साडेबाराच्या सुमारास मुलुंड येथील वसंत गार्डन परिसरातील विलोझ टॉवरमध्ये घडली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ee9b31a-a469-11e8-b5ff-cd53c4fe6011′]

सतनाम सिंग प्यारासिंग बोपाराई (वय – ५४) असे आत्महत्या करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची मुलुंड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सतनाम हे मुलुंडच्या वसंत गार्डन येथील विलोज टाँवरच्या पंधराव्या माळ्यावर राहत होते. भांडुपमध्ये त्यांचे शेरा नावाचे हॉटेल आहे. तसेच ते बोपाराईज् मार्शल सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक देखील होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांना हॉटेल व्यवसायामध्ये नुकसान होत होते. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. त्यातूनच त्यांना नैराश्य आल्याने त्यांनी स्वत:च्या परवाना धारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून घरातल्यांनी बेडरूमच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात सतनाम पडलेले घरातल्यांना आढळून आले.

घरातल्यांनी त्यांना तातडीने फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. माञ डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मुलुंड पोलिसांनी ही आत्महत्या नैराश्येतून झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तसेच त्यांना दारूचे व्यसन जडले असल्याकारणाने त्याचा लिव्हर देखील खराब झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83d1666e-a469-11e8-a208-2d8fd9a8d9fb’]

मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपघातीमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून एक रिव्हॉल्वर, रिकामं काडतूसं आणि 5 जिवंत राऊंड जप्त केले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.