पुण्यात आयटी इंजिनिअरची 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत काम करणार्‍या आयटी इंजिनिअरने 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन पुढील तपास चालु आहे.

रोहित बापुराव पाटील (28) असे आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनिअरचे नाव आहे. ही घटना वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल आर. ग्रीन सोसायटीमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रोहित ने आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. रोहिता हा त्याच्या भावासह रहावयास होता. त्याचा भाऊ कंपनीत कामाला गेल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचा तपास चालु आहे.

Loading...
You might also like