धामण गावात विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील धामण गावात राहते घरात विवाहितेने विष प्राशन करुन आत्माहत्त्या केली. बीष प्यायल्यानंतर ती अचानकपणे जमिनीवर कोसळल्याने मोठा आवाज झाला. घरात दुसऱ्या खोलीत काम करणाऱ्या सासुला घरात काही तरी पडल्याचा आवाज येताच तिने पाहिले असता सुनच जमिवर पडलेली दिसली.

सासुने आरडाओरड करत नातेवाईकांच्या मदतीने सुनेला लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारादरम्यन ती दगावली. डॉक्टरांनी तीची तपासणी करुन तिला मृत घोषित केले.

तिचे शव शवविच्छदन कक्षात आणले असता तिथे नातेवाईकांची गर्दी झाली. नातेवाईकांच्या आरोप प्रत्यारोपामुळे काही वेळ शव विच्छेदन कक्षाजवळ तणाव निर्माण झाला होता. आत्महत्या का केली याबाबत नेमके कारण कळू शकले नाही. तालुका पोलीसांनी यावेळी मध्यस्थी करत वाद मिटवला व मृत देह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. सदर घटने बाबत अकस्मात मृत्युची नोंद तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like