एकतर्फी प्रेमातून मजूराची गळफास घेऊन आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकतर्फी प्रेमातून ठाण्याच्या वाघबीळ भागात राहणाऱ्या सरोज पाटणदिन (वय २२) या तरुणाने चिंचेच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना आनंदनगर जंक्शनजवळ बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सरोज हा बिगारी कामगार असून वाघबीळ, आनंदनगर जंक्शनजवळील एका भिंतीवर आत्महत्येपूर्वी त्याने स्वत:चे आणि एका मुलीचे नाव टाकून मै तनहा हूं, असे लिहिले आहे. कासारवडवली पोलिसांनी शवविच्छेदनानंतर वाघबीळ येथील त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात त्याचा मृतदेह दिला. एकतर्फी प्रेमातून नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.