दोन मुलांसह आईची गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या

शेळगावः पोलीसनामा ऑनलाईन

आपल्या दोन मुलांसह आईने गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शेळगाव जवळील गोदावरी नदीत आज शनिवार (दि.23 जून) दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे. पुजा यादव कांबळे (वय-35), शिवानी यादव कांबळे (वय-7), सुविद्या यादव कांबळे (वय-3) अशी मृतांची नावे आहे. आत्महत्या केलेली महिला ही कुंडलवाडी तेथील आचारी काम करणारे यादव कांबळे यांची दुसरी पत्नी असल्याचे समजते आहे.

सदर मयत महिला ही मागील दोन महिन्यांपासून माहेरी राहत होती अशी माहिती मिळत आहे.सुविद्या या तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह हाती लागला असून, शवविच्छेदनासाठी कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली आहे.