बारावीत नापास झाल्याने विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – बारावीत नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला आहे.

उज्ज्वला भगवान अस्वार (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उज्ज्वला अस्वार हिचे आई वडील शुक्रवारी सकाळी शेतात गेले होते. तर तिचा भाऊ जैन कंपनीत काम करतो. तो रात्रपाळीला कामाला गेला होता. तो सकाळी घरी परतला तेव्हा बहिणीने घरात दोरीने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. त्यानंतर त्याने लागलीच याची माहिती त्याचा आई वडिलांना दिली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Loading...
You might also like