इंजिनिअरिंगच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी :  पोलीसनामा आॅनलाईन

रत्नागिरीत तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत शेवटच्या वर्षाला शिकणा-या १९ वर्षाच्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  संजना ऊर्फ सोनाली पेंडुरकर असे तिचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मालवणमधील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ebd18ee-7902-11e8-a78c-0b00f054a675′]

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण शहरातील धुरीवाडा कन्या शाळेजवळ एका कॉम्प्लेक्समध्ये पेंडुरकर कुटुंब राहते. संजय पेंडुरकर हे नेहमीप्रमाणे आपल्या सुवर्ण पेढीवर गेले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगी संजना घरातच होत्या.

संजय यांच्या पत्नी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुकानावर गेल्या. दोन वाजताच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून संजनाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती मालवणला घरी आली होती. संजनाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.