भाजप वार्ड अध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीच्या जय भवानी नगर येथील बॉर्ड क्र. ९२ च्या वॉर्ड अध्य़क्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे. त्याने आत्महत्येपुर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात एका महिलेच्या व कॉंग्रेस नगरसेविकेच्या पतीने दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकऱणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील प्रल्हाद अहिरे (३५) असे आत्महत्यात केलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकऱणी गुन्हा दाखल करून तातडींने अटक करण्यात यावी अशी मागणी करत आमदार अतूल सावे आणि अहिरे यांच्या नातेवाईकांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर तासभर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांसोबत आमदारांची शा‍ब्दिक चकमक झाली. त्यानतंर पोलिसांनी छाया मनोहर लोखंडे, मोहन नाना साळवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया लोखंडे आणि सुनील अहिरे यांच्यात मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरु असल्याचने सुनील अहिरे यांची पत्नी मीरा यांनी छाया लोखंडें यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर छाया आणि सुनील यांच्यातील वाद टोकाला गेले. त्यानंतर रविवारी रात्री सुनील अहिरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली असून त्यात छाया लोखंडे आणि नाना साळवे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

ह्याहि बातम्या वाचा-

, राफेलची फाईल हरवली आहे, कुठे मिळते का बघा ? ठण्यात पोस्टरबाजी

सैन्य भरतीला आलेल्या युवकाकडे सापडली २ ग्रेनेड

युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

पूर्ण रमजानच्या महिन्यात मतदान थांबवणे शक्य नाही : निवडणूक आयोग