Suicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर ‘मैं चोर नहीं हूं’ असा उल्लेख

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  चोरीच्या आरोपाखाली 14 जूनच्या रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये (Kondhali Police Station) ट्रक चालक अशोक नागोत्रा (Truck driver Ashok Nagotra) विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, नागपूरमधील (Nagpur) कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर ट्रक चालक अशोक नागोत्रा याने ट्रकला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. त्यांच्या हात आणि पायावर ‘मैं चोर नहीं हूं’ (I am not a thief) असं लिहिल्याचं (Mention) आढळलं आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. (new twist in truck driver suicide case)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलीस स्टेशनसमोर आत्महत्या (Suicide in front of the police station) मैं चोर नहीं हूं

अशोक नागोत्रा नावाच्या ट्रक चालकाने मंगळवार (दि.15) सकाळी कोंढाळी पोलीस स्टेशनसमोरच ट्रकच्या केबिनला (Truck cabin) तार बांधून गळफास घेतला होता. त्याच्या शवविच्छेदनादरम्यान (Postmortem) आत्महत्येपूर्वी त्याच्या डाव्या हातावर “मैं चोर नहीं हूं” असं लिहिल्याचे दिसून आलं. दरम्यान, 9 जूनच्या रात्री अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील (Nagpur district) सातनवरी (Satnavari) शिवारातील बाजारगाव इथल्या पेट्रोल पंप (Petrol pump) जवळून तेलाचे पिंप (Oil pimp) चोरीला गेले होते. त्यावेळी भिवंडीला (Bhiwandi) तेलाचे पिंप घेऊन जाणारे अशोक नागोत्रा पेट्रोल पंपावर डिझेल (Diesel) भरण्यासाठी थांबले होते.

चोरीची 5 दिवसांनी तक्रार

यासंदर्भात ट्रान्सपोर्ट (Transport) मालकाने चोरीच्या घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे 14 जून ला संध्याकाळी कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये (Kondhali Police Station) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा (अफरातफर) गुन्हा (FIR) दाखल करत ट्रक पोलीस स्टेशनच्या समोर उभा केला होता. मात्र, काल सकाळी पोलिसांनी आणून ठेवलेल्या ट्रकला गळफास घेतलेल्या अवस्थेत अशोक नागोत्रा आढळले.

Pune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा

पोलिसांकडून तपास सुरु (Police start investigation)

या प्रकरणात ट्रान्सपोर्ट मालकाने घटनेच्या पाच दिवसानंतर तक्रार का दिली ? पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्यावर अवास्तव दबाव आणला होता का ? त्यांना कोणी मारहाण केली होती का? प्रामाणिक असूनही ट्रक मालक आणि पोलिसांनी त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवल्यामुळे नैराश्यात त्यांनी आत्महत्या केली आहे का ? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरे केवळ पोलिसच देऊ शकतात.

Web Title :  Suicide Case | new twist in truck driver s suicide case in front of police station in nagpur i am not a thief mention on hand

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update