व्हिडीओ कॉल दरम्यान पत्नीला दाखवण्याच्या चक्करमध्ये पतीला चुकून लागली फाशी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात सोमवारी एका व्यक्तीने कुवैत येथे काम करणार्‍या आपल्या पत्नीला दाखविण्यासाठी व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचे नाटक करत होता, तेव्हा तो चुकून फासावर लटकला गेला. पोलिसांनी सांगितले कि, आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात सोमवारी एक दुःखद घटना घडली. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, या जोडप्याने त्यांचे संबंध तोडले होते.

तल्लापुरी ब्लॉकच्या मलकापल्ली गावात राहणारा 35 वर्षीय जी. गणेशची इच्छा होती की, कुवेतमध्ये काम करणारी त्याची पत्नी घरी परत यावी आणि त्याने परत येण्यासाठी तिला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल दरम्यान गणेशने आपल्या पत्नीला परत येण्यास सांगितले, यावरुन दोघांमध्ये वाद झाला. गणेशने पत्नीला सांगितले की, ती घरी परत आली नाही तर तो त्याचा जीव देईल.

हा वाद इतका वाढला की, तो एका खाटेवर उभा राहिला आणि त्याच्या गळ्याला फास बांधला आणि दोरीच्या दुसर्‍या टोकाला पंख्याने बांधले. मात्र, पत्नीला धमकावताना गणेश घसरुन पडला आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह कोव्वूर येथील सरकारी रुग्णालयात दिला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गणेशच्या मोबाइल फोनमध्ये कैद झालेल्या व्हिडिओ कॉल आणि जोडप्याच्या संभाषणाच्या आधारे तपास सुरू केला गेला आहे. पोलिस त्याच्या कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी करत आहेत.