अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या !

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – उमरखेड (यवतमाळ) येथील पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या तरुणांने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

विवेक प्रकाश कदम (वय 29) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते महागाव येथील पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. सोमवारी कदम यांनी पाटीलनगर परिसरातील किरायाच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ते मूळचे नांदेड येथील रहिवाशी होते. त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी असा परीवार आहे.

You might also like