आश्चर्य ! दिल्लीच्या महिलेची गाजियाबादमध्ये आत्महत्या, मात्र बंगळुरूमध्ये जिवंत सापडल्याने प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील एका उच्चभ्रू घरातील विवाहित महिलेने आत्महत्येचे नाटक करत आपल्या सासरच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आज खुलासा झाला. या महिलेने आपली गाडी गाज‍ियाबाद येथील एका ठिकाणी लावून त्यात सुसाइड नोट ठेवून फरार झाली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता हि महिला बंगळुरूमध्ये सापडली. आत्महत्येची खोटी कहाणी रचणाऱ्या या महिलेने आपली गाडी या नाल्याच्या शेजारी लावून पोलीस आणि घरच्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. यानंतर या महिलेने या नाल्यात उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी सगळीकडे पसरली.

शनिवारी सकाळी ११ वाजता पोलिसांना नाल्यावर स्कॉर्पिओ गाडी उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासले असता पोलिसांना गाडीत एक सुसाईड नोट मिळाली. हि माहिती मिळाल्यानंतर सलग ३ दिवस या महिलेचा या नाल्यात शोध घेण्यात आला. मात्र तिचा मृतदेह मिळाला नाही. तिने या सुसाईड नोटमध्ये आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. पतीच्या त्रासाला कंटाळल्यामुळे तिने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पती आणि त्याच्या घरच्यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी तिने हे नाटक रचले होते. हे नाटक करणाऱ्या महिलेचे नाव हे कोमल तालान असून भारतीय क‍िसान यून‍ियनचे (भाकियू) राष्ट्रीय सचिव अनिल तालान यांची ती मुलगी आहे. याप्रकरणी अनिल तालान यांनी आरोप करताना म्हटले कि, एका वर्षांपूर्वी दिल्लीतील पांडव नगरमधील अभिषेक याच्याबरोबर तिचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नामध्ये जवळपास दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र तरीदेखील तिला सासरी त्रास दिला जात होता. अभिषेकचे वडील हि दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत आहेत. कोमल घरातून निघून गेल्यानंतर तिच्या सासरच्यांनी पोलीस स्टेशनममध्ये तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, तपासात हि महिला बेंगळुरू मध्ये सुस्थितीत मिळून आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान