विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन

माहेराहून पैसे आणावेत व चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील वडनेर खु. याठिकाणी घडली. याप्रकरणी पती, सासू, सासरे व दिर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शिरुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ca037bb-ce18-11e8-8bd9-bd45745afd01′]

सुरेखा आनंद पवार (वय -२१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती आनंदा बाजीराव पवार, सासरे बाजीराव दशरथ पवार, सासू  रंजना बाजीराव पवार  व दिर कुंदन बाजीराव पवार (सर्व रा.वडनेर खु.ता.शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील शिवाजी भगवान साळुंके (वय ४६ रा. तेजेवाडी ता .जुन्नर जि.पुणे) यांनी शिरूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4739d70e-ce18-11e8-9cc8-951bc641fc25′]
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा पवार आणि सुरेखा पवार यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी  सुरेखा पवार हिचा माहेराहून वेगवेगळ्या कामांसाठी पैसे आणावेत तसेच चारित्र्याच्या संशयावरून तिला वेळोवेळी घालून पाडून बोलून व तिला वेळोवेळी मारहाण केली. सासरच्या जाचाला कंटाळून तिने विषारी औषध पिल्याने ९ ऑक्टोंबर रोजी रात्री  आठ वाजण्याच्या सुमाराला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोंगडे करीत आहेत.