धक्कादायक ! पुस्तकाच्या 50 पानांवर ’I hate my life’ लिहून घेतला गळफास, 9 वीत शिकत होती विद्यार्थीनी

भिलाई : वृत्तसंस्था – छत्तीसगढच्या भिलाईमध्ये आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या Suicide करणारी मुलगी आपल्या पाठीमागे अनेक रहस्य सोडून गेली आहे. इयत्ता नववीतील या विद्यार्थिनीने पुस्तकाच्या 50 पानांवर ’I HATE MY LIFE’ लिहून ठेवले आहे. suicide hanged writing i hate my life 50 pages book student study durg bhilai

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ही घटना भिलाईच्या खुर्सीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, येथील 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी एम चांदणीने फास लावून आत्महत्या केली. यामुळे कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांना समजत नाही की अखेर हे का झाले ?

घटनेच्या वेळी तिचे आई-वडील ओळखीच्या व्यक्तीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कुठेतरी गेले होते.
कुटुंबिय घरी आल्यानंतर पोलिसांनी फासावर लटकणारा तिचा मृतदेह खाली काढला आणि पीएमसाठी पाठवला.
पोलिसांना घटनास्थळी एक पुस्तक मिळाले आहे ज्याच्या 50 पानांवर या अल्पवयीन मुलीने इंग्रजीत ’आय हेट माय लाइफ’ लिहिले आहे.
एका पानावर तिने तरूण-तरूणी सोबत बसले असल्याचे एक चित्र सुद्धा काढले आहे.
तर एका पानावर एकटी बसलेल्या तरूणीचे स्केच आहे.

Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 286 नवीन रुग्ण, 133 रुग्णांना डिस्चार्ज

आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना समजले की, चांदणी 9 वीत शिकत होती.
सकाळी आई-वडील बाहेर गेले होते. एकटे असल्याचे पाहून या मुलीने आत्महत्या केली.
शेजार्‍यांनी पोलीस आणि तिच्या कुटुंबियांना माहिती दिली.
यानंतर घटनेची माहिती मिळाली. कुटुंबियांनी सांगितले की, चांदणीची एका तरूणासोबत मैत्री होती. सध्या याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Web Titel : suicide hanged writing i hate my life 50 pages book student study durg bhilai 

Pimpri-Chinchwad Crime News | बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘या’ 10 ठेकेदारांवर FIR, 8 जण ब्लॅक लिस्टमध्ये

Anil Deshmukh | देशमुखांच्या सचिवांचे तपासादरम्यान सहकार्य नाही, सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगतात – ED

Pune Crime Branch Police | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीपाठोपाठ मुलाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई