Suicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील (Tehsildar Trupti Kolte Patil) यांच्या वाहन चालकाने (Driver) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. Suicide | Haveli Tehsildar Trupti Kolte Patil’s government driver committed suicide by hanging himself at his residence, suicide note …

अरुण मधुकर दीक्षित (वय 50 रा. जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sanghavi Police Station) घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित हे हवेली तहसील कार्यालयात (Haveli Tehsil Office) शासकीय कार चालक (Government car driver) आहेत. सध्या हवेली तहसीलदार म्हणून तृप्ती कोलते पाटील या कार्यरत आहेत. या दरम्यान आज सायंकाळी दीक्षित यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याबाबत तृप्ती कोलते पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी चालक दीक्षित यांना पित्ताचा त्रास होता. ते आजाराने त्रस्त होते. त्याने दुसरा ढोस घेतला होता, असे सांगितले आहे.. घटनास्थळी सांगवी पोलिसांनी धाव घेतली आहे. अधिक तपास सुरू आहे.

याबाबत सांगवी पोलिसांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून ते घरीच होते.
त्यांना पित्ताचा त्रास होता.
आज सायंकाळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली आहे.
त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळालेली नाही. अधिक तपास सुरू आहे.

Wab Title :- Suicide | Haveli Tehsildar Trupti Kolte Patil’s government driver committed suicide by hanging himself at his residence, suicide note …

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत

Gold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले, जाणून घ्या आजचा भाव