Post_Banner_Top

धक्कादायक ! ओळखीतील माणसानेच केला ‘घात’ ; अंगावर पेट्रोल ओतून तरुणाची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कष्टाचे पैसे दिलेल्या ओळखीतील माणसाने हात वर केल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी येथे शुक्रवारी घडली.

संदीप बैसाने (२८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश उंदा बैसाने (३६, रा. बामणे, ता. सिंदखेडा, जि. धुळे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर मंगल बापू आव्हाड (३८, रा. दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप याने पिंपरी-चिंचवड शहरात काम करून जमा केलेले पैसे आव्हाड याच्याकडे ठेवण्यासाठी दिले. कालांतराने गरजेच्या वेळी संदीपने आव्हाडकडे पैशांची मागणी केली. मात्र, संदीपला पैसे मिळाले नाहीत. या नैराश्यातून संदीपने आव्हाड याच्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तपास निगडी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like