पुण्यात पत्नीसोबत झालेल्या वादातून लाकूड कापण्याच्या यंत्राने गळा चिरून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणामधून एकाने आपल्या गळ्यावर लाकूड कापण्याची कटर मशीनने गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना वारजे गावठाणातील पायगुडे बिल्डींगमध्ये गुरुवारी सायंकाळी घडली.

संजय़कुमार रंगलाल प्रसाद भारती (३४, रा. उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संजयकुमार भारती हा मुळचा उत्तरप्रदेशचा राहणारा आहे. तो वारजे गावठाण येथे पायगुडे इमारतीमध्ये राहण्यास आहे. त्याचे आणि त्याच्या पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून त्याने गुरुवारी सायंकाळी रागाच्या भरात आपल्या घरातील लाकूड कापण्याची कटर मशीन गळ्यावर चालवून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच वारजे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी तो ससून रुग्णालयात पाठवून दिला आहे.

You might also like