Nashik News : विवाहित युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –  एका विवाहित तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. शिरसाने (ता. चांदवड) येथे मंगळवारी (दि.16) सायंकाळी ही घटना घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

गोरख घोलप ( वय 32, रा. शिरसाने) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोरख घोलप याने मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारांसाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरख हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.