संतापजनक ! बलात्कार केल्यानंतर ‘ब्लॅकमेलिंग’ करणार्‍यांच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या

सेनगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पाच वर्षांपूर्वी काढलेल्या व्हिडीओवरून ब्लँकमेल केल्यामुळे त्रासलेल्या एका महिलेने गुरुवारी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच वर्षांपूर्वी महिला गर्भवती असताना तिच्यावर तिघांनी बलात्कार करून त्याचा व्हिडीओ काढला होता आणि त्यावरून तीनही आरोपी ब्लॅकमेल करत असल्याने महिला त्रस्त झाली होती.

याप्रकरणी चंद्रभान गणपत कायंदे , परमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून तिघेही फरार आहेत.आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने लिहिलेल्या चिट्ठीमध्ये तीनही आरोपींच्या नावाचा उल्लेख आढळून आला आहे.

२२ डिसेंबर २०१५ ला महिलेच्या घरात घुसून तीनही आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला होता. तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. आरोपींनी अत्याचाराचा व्हीडिओ तयार केला होता. कुटुंबियांना सांगितल्यास संसार उद्ध्वस्त होईल, अशी भीती महिलेला वाटत होती. मात्र त्यानंतर आरोपींद्वारे तिला वारंवार शरीर सुखाची मागणी केली जात होती.

त्रस्त झालेल्या महिलेने अखेर सेनगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याची सुनावणी अद्याप पूर्ण झाली नाही. ही केस अजूनही न्यायालयात आहे. विशेष म्हणजे महिलेने एकदा न्यायालयात इलेक्ट्रिक बोर्डात हात घालून आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता.

पोलिसांकडून झाली होती टाळाटाळ
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर देखील पोलिसांकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती याबाबत पोलिसांकडून अनेकदा टाळाटाळ झाली म्हणूनच महिलेने इतके टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like