6 महिन्यापुर्वी पत्नी गेली माहेरी, परत येत नसल्यानं पतीनं केलं असं काही

वाई : पोलीसनामा ऑनलाइन – वाई ( Wai) तालुक्यातील धर्मपुरी पेठेतील प्रमोद सुरेश ओसवाल ( Pramod Suresh Oswal) यांनी गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या ( Sucide) केली. वाई पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

सराफ व्यापारी महेश ओसवाल ( Mahesh Oswal) यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा लहान भाऊ प्रमोद याने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे.उपचारासाठी दाखल करण्याआधी त्याचा मृत्यू झाला होता. प्रमोद याची पत्नी ६ महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती, ती परत येत नव्हती. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. हवालदार माने यांच्याकडून पुढील तपास करण्यात येत आहे.