Suicide News | काँग्रेसच्या युवा नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

छत्तीसगड : वृत्तसंस्था (policenama online) – छत्तीसगडमधील काँग्रेसचे (Congress) युवा नेते पारस गोस्वामी (paras-goswami) यांनी कोंडागाव येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली आहे. शुक्रवारी (25 जून) सायंकाळी 7 सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवला. पारस यांनी कौटुंबिक वादातून (Family Matters) आत्महत्या केल्याच्या प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. Suicide News | chhattisgarh congress leader paras goswami commits suicide

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

पारस गोस्वामी हे मजदूर संघाचे (Mazdur Sangh) जिल्हाध्यक्षही होते. तसेच स्थानिक पातळीवर लोकप्रिय नेते होते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख मोहन मरकाम आणि सरचिटणीस मनीष श्रीवास्तव यांनी पारस यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आडका छेपडा वॉर्डमध्ये राहणाऱ्या पारस गोस्वामी यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आले. यापूर्वीही एकदा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एका महिन्यापूर्वीच त्यांनी विषारी पदार्थ (Poison) खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या मित्रांनी वेळीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला होता. पारस हे आपल्या घरातले एकमेव कमावती व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि दोन मुल असा परिवार आहे. त्यांची मोठी मुलगी चौथीत शिकते, तर छोटा मुलगा चार वर्षांचा आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- Suicide News | chhattisgarh congress leader paras goswami commits suicide

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती