Suicide News | दुर्देवी ! पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लाडका बोकड (goat) विकल्याने २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केल्याचे उघडकीस आले आहे. बुधवारी सांताक्रुझ येथील शास्त्री नगर भागामध्ये ही घटना घडली. नदीम खान (Nadeem Khan) असं त्याच नाव आहे. Suicide News | mumbai 23 years old boy commits suicide upset about sale of his goat man hangs self

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नदीमची घरची परिस्थिती नाजूक होती.
त्यामुळे पैशासाठी नदीमच्या आईने काही दिवसापूर्वी त्याचा लाडका बोकड विकला.
तेव्हापासून नदीम निराश झाला होता.
बुधवारी सकाळी नदीमने नायलॉनच्या दोरीने घरामध्येच गळफास घेतला.
बराच वेळ झाला तरी नदीम दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याच्या बहिणीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
त्यावेळी त्यांना नदीम नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
शेजारच्यांनी नदीमला खाली उतरवून तातडीने जवळच्या रुग्णालयात नेहले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये अपघाती मृत्यूची (Accidental death) नोंद करुन घेतली आहे.

Wab Title :- Suicide News | mumbai 23 years old boy commits suicide upset about sale of his goat man hangs self

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत