Suicide News | धक्कादायक ! मुंबईत माजी महिला पत्रकाराची 7 वर्षाच्या मुलासह आत्महत्या

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  एका माजी महिला (Former Journalist ) पत्रकाराने आपल्या 7 वर्षाच्या मुलासह मुंबईतील चांदीवली (Chandivali in Mumbai) येथील टिलिपिया इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide News) केली आहे. सोमवारी (दि. 21) पहाटे अडीचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल (crime registered) केला आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून यात तिने त्याच इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. सुसाईड नोटच्या (Suicide note) आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक झाली नाही. Suicide News | mumbai former journalist reshma trenchil jumps with seven year old son suicide note

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

रेश्मा ट्रेंचिल (Reshma Trenchil) (वय 44 रा. टिलिपिया इमारत, चांदिवली, मुंबई ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोरोनामळे काही दिवसापूर्वी रेश्माचा पती सैराट मुलुकुतला याचा मृत्यू झाला होता.
तेंव्हापासून ती नैराश्यात (Depression) होती.
रेश्मा आणि तिचा पती आपला मुलासह10 एप्रिल रोजी चांदिवलीतील नवीन फ्लॅटमध्ये राहायला आले होते.
तेंव्हापासून आरोपी कुटुंबियांसोबत त्यांचे मतभेद होते.
मुलाच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार आरोपी कुटुंबियांनी इमारतीच्या सोसायटीकडे केली होती.
या घटनेनंतर विभागीय पोलीस आयुक्त महेश्वर रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त (अंधेरी) यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
रेश्माच्या एका पानाच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी कुटूंबाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title : Suicide News | mumbai former journalist reshma trenchil jumps with seven year old son suicide note

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Murder in Mumbai | … म्हणून मुंबईत बोलावून तरुणाची केली निर्घृण हत्या, चौघांना अटक