सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

वैराग : पोलिसनामा ऑनलाईन – सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जवळगाव नं. 1 (ता. बार्शी) येथे बुधवारी बुधवार (दि.१०) रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली असून सुप्रिया महादेव कापसे (वय ३१) असे या विवाहितेची नाव आहे.

दरम्यान या प्रकरणी विवाहितेचे वडील नरसिंग गोविंद जगताप (रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासरा अशा तिघांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवळगाव नं. 1 येथील रहिवासी महादेव भागवत कापसे यांच्याबरोबर आठ वर्षांपूर्वी सुप्रिया हिचा विवाह झाला होता. लग्नानंतर चारित्र्याच्या संशयावरून पती महादेव कापसे, सासरा भागवत कापसे, सासू मुक्ताबाई हे मुलीस वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होते. शिवाय गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आण म्हणत छळ करत होते. याबाबत आपल्या मुलीने वारंवार मला फोनवरून हे सांगितले होते. बुधवार, १० फेब्रुवारी रोजी तिने आत्महत्या केली, ती पती, सासू व सासरा यांच्या त्रासाला कंटाळूनच केली असे नरसिंग जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे करीत आहेत.