संगमनेरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन – प्रेम प्रकरणातून तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे घडली आहे. योगेश शंकर सारबंदे (वय 25) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना अटक करण्यात आली आहेअनिल खेमनर, बबलु खेमनर, भगीरथ भुसाळ (रा. उंबरी बाळापूर, ता. संगमनेर) व बाळासाहेब जर्‍हाड (रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

योगेशचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, त्याची माहिती मुलीच्या कुटूंबियांना समजली. त्यामुळे त्यांनी तिचे लग्न जमविले. मात्र, ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या लग्नाची माहिती योगेश पोलिसांना देईल या भीतीने तिघांनी त्याला मारहाण केली होती. 6 ऑगस्ट रोजी योगेश हा चुलते राजेंद्र सारबंदे याच्या विहिरीजवळ बेशुद्ध स्थितीत आढळून आला. त्याच्या शेजारी विषारी औषधाची रिकामी बाटली पडलेली होती. या वेळी विक्रम बोर्‍हाडे, महेश भुसाळ यांच्या मदतीने योगेशला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून योगेश मयत झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दवाखान्यात येऊन पंचनामा केला. त्यानंतर उंबरी बाळापूर येथे योगेशचा अंत्यविधी करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like