दहा वर्षे लहान प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीनसामा ऑनलाईन – प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने राहत्या घरी ओढणीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित प्रियकर व त्याच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिलाषा श्रीमंत गायकवाड ( ३४, गोकुळनगर ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे . माऊली उर्फ ज्ञानेश्वर सागवे (२५, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) व गंगाधर सागवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर श्रीमंत गायकवाड (७२, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा ही काही महिन्यांपुर्वी एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करत होती. घराचे बांधकाम सुरु झाल्याने तीने सात ते आठ महिन्यांपुर्वी नोकरी सोडली. त्यानंतर तिने घराच्या बांधकामाचे सर्व काम पाहण्यास सुरुवात केली. तिच्या घराचे बांधकाम सुरु होते. त्याच्या शेजारीच माऊली एका गॅरेजमध्ये काम करत होता. तो कधी कधी तेथे बांधकामाचे साहित्य तसेच इतर कामात मदत करत होता. दोघांची चांगली ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. त्यानतंर दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तो तिच्यापेक्षा ८ ते १० वर्षांनी लहान होता. काही काळ गेल्यानतंर तिने त्याला लग्न करण्याची मागणी केली. मात्र तो लग्नाला नाही म्हणत होता . हा प्रकार अभिलाषा हिच्या कुटुंबियांनाही माहिती होता . त्यानंतर तिने यासंदर्भात माऊलीच्या वडीलांनाही याबाबत सांगितले. त्यांना येऊन मुलाला समजावून सांगण्यास सांगितले. परंतु तो तयार होत नव्हता. त्यामुळे त्याने लग्नाला नकार दिल्याच्या नैराश्यातून तिने राहत्या घरी सोमवारी (दि. ४) गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.