लग्न जुळत नसल्याने बहीण भावाने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या

खेड : पोलीसनामा ऑनलाईन – लग्न जमत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सायंकाळी उशिरा घटना उघडकीस आली असून रंजन गणपत भोपळे आणि शैला गणपत भोपळे असे आत्महत्या केलेल्या बहीण भावाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74b44811-d287-11e8-a6b7-212fc3387bc9′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील डेणेगाव येथे राहत्या घरी विषारी औषध घेऊन बहीण आणि भावाने आत्महत्या केली आहे. मयत रंजन गणपत भोपळे वय-४० आणि शैला गणपत भोपळे वय-३८ रा. डेणेगाव ता. खेड, जि. पुणे दोघे ही एकत्र राहातात त्यांच्या आईवडिलांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले आहे. रंजनचा विवाह झाला असून त्याचा पत्नीसोबत काडीमोड झाला आहे. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहते. रंजनला दुसरा विवाह करायचा होता तसेच बहिण देखील अविवाहित असून विवाह जुळत नव्हता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे, शैलाचे वय देखील वाढत चालले होते.

[amazon_link asins=’B01121OHVI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7bf3c026-d287-11e8-9319-f304bdcb15d9′]

दुपार पासून घर बंद असल्याने त्यांची चुलत बहीण पाहण्यासाठी गेली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शैलाची हालचाल सुरू होती तिला ग्रामस्थांनी तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिकचा तपास खेड पोलीस करत आहेत.

शिक्षण सम्राट मारुती नवले यांची रवानगी येरवडा कारागृहात